APMC Nagpur
Kalamna Market
 
Vegetable Market मुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा
 
AMPC
 
महत्वाची माहिती
दैनंदिन बाजारभाव
सर्वसाधारण माहिती
संचालक मंडळ
महत्वाची संकेतस्थळे
msamb.com
agmarknet.nic.in
APMC Nagpur
संपर्क

दूरध्वनी क्रमांक
0712-2680280

फॅक्स क्रमांक
0712-2680448
 
संस्थे विषयीची माहिती
 

नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, सन 1974 मध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न विपणन नियम 1963 च्या कायद्यांतर्गत प्रस्थापीत झाली. त्या आधी व नंतरही नागपूर शहरांत धान्य उपबाजार, संत्रा व फळे उपबाजार, आलु-कांदा उपबाजार, मिरची व गुरे उपबाजार वेगवेगळया ठिकाणी भरत होते. बाजार समिती प्रस्थापीत झाल्यानंतर हे सर्व उपबाजार एकाच ठिकाणी एकत्र आणावे म्हणून पदाधिका-यानी नागपूर सुधार प्रन्यासकडून जागेची मागणी केली.

उपबाजारांच्या परिस्थितीचा विचार करून व त्यांचे गांभीर्य लक्षांत घेवून नागपूर सुधार प्रन्यासने बाजार समितीला 1981 साली 110 एकर जागा दिली. बाजार समितीला 110 एकर जागा मिळाल्यानंतर मे. किर्लोस्कर कन्सलटंटस्, पुणे यांना फिजीबिलिटी व झोनल प्लॅन रिपोर्ट सादर करण्याकरीता आमंत्रित केले. त्यानुसार त्यांनी 1981-82 मध्ये बाजार समितीला फिजिबिलिटी व झोनल प्लॅन रिपोर्ट सादर केला.

फिजिबिलिटी व झोनल प्लॅन रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर बाजार समितीने भारतातील सुप्रसिध्द वास्तुशिल्पकार मे. शिवदानमल मोखा,नागपूर याचेकडे बांधकामाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली. ईमारतीचा बांधकाम आराखडा तयार झाल्यानंतर व नागपूर सुधार प्रन्यासने बांधकाम करण्याकरीता मंजूरी प्रदान केल्यानंतर बाजार समितीने सन-1988 ते 1992 पर्यत 34 कोटी रूपये खर्च करून पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड वर बांधकाम केले. सर्व उपबाजार (इतवारी धान्य बाजार व भाजी बाजार सोडून) नागपूर शहरांतून पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, कळमना या ठिकाणी शासकीय अधिसुचनेनुसार स्थानांतरीत करण्यांत आले.

बाजार समितीने स्वत:च्या निधीतून बाजार उभारणी व बांधकामावरील विकास कार्य केलेले आहे. बाजार समितीवर कोणाचेही कर्ज किंवा अनुदान नाही तसेच बाजार आवारातील सर्व सुविधा आणि सेवा समितीच्या स्वत:च्या उत्पन्नातून निर्मित आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूरची संक्षीप्त माहिती

अ.क्र विवरण तपशिल
1 नाव व पत्ता नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती,
पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, कळमना, नागपूर-35
2 अधिसुचना तारीख 16 नोव्हे. 1974
3 नियमनाची तारीख 21 जाने 1975
4 नियमनाचा कायदा महाराष्ट्र कृषि पणन खरेदी-विक्री (नियमन) अधिनियम 1963
5 प्रशासकीय अधिकार 1.पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पूणे 
2.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर 
3.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर 
यांना निरनिराळया कलमान्वये अधिकार देण्यात आले आहे.
6 समितीचे कार्यक्षेत्र नागपूर तालुकयातील 211 गावे
7 मुख्य बाजार व उपबाजार मुख्य बाजार - धान्य बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
उपबाजार :-
1.संत्रा व फळे बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
2.मिरची बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
3.गुरे बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
4.आलु-कांदा व भाजी बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
5. फुल बाजार, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर
6.महात्मा फुले भाजीबाजार नागपूर
7.कापूस बाजार,बैधनाथ चौक, गणेशपेठ, नागपूर
8.कळबी बाजार, घाट रोड, नागपूर
9.कापूस बाजार, बुटीबोरी
8 सुविधा 1.लीलाव दालन
2.गोदाम
3.रस्ते
4.विद्युत व्यवस्था
5.पिण्याचे पाणी
6.पोलीस स्टेशन
7.पोस्ट ऑफीस
8.तार घर
9. उपहारगृहे
10.धर्मकाटे
11.कुपनलीका
12.वेअर हाउस
13.जनरल दुकाने
14.शेतकरी निवास
15.जल शुध्दीकरण केंद्र
16.माती परीक्षण केंद्र
9 वखार समितीने शेतक-याच्या सोयीकरीता 3300 मेट्रीक टन क्षमतेचे वखार समितीचे आवारात बांधलेले आहे. आणि समितीने शेतमाल तारण योजना सुरू केलेली आहे. मालाचे किमतीच्या 75 टक्के एवढे कर्ज 6 टक्के व्याजाच्या दराने 180 दिवसाकरीता देण्यात येत आहे.
10 बाजार आवारातील बँका पंजाब नॅशनल बॅक
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक
नागपूर नागरीक सहकारी बॅक
सारस्वत बॅक
11 बाजार भाव प्रसारणाचे माध्यम 1. रेडीओ
2. सुचणा फलक
3. वर्तमाणपत्र
4. संकेतस्थळे
12 अधीसुचीत शेतमाल मका, गहु, तांदूळ, धान, तुर, मुग, तिळ, जवस, शेंगदाणा (फोडलेला व न फोडलेला) हरभरा, सोयाबिन, चवळी, ज्वारी, बाजरी, सरकीन, एरंडी, अंबाडी, संत्रा, आंबा, केळी, बोर व इतर फळ फळावळे, मिरची, हळद, गुरे ढोरे, शेळी, मेंढी, बकरे, कोबडया, कळबा, कळबा (कटाई), गवत, बटाटे, कांदे, सुरण, टमाटे, पालेभाज्या व ताज्या भाज्या, कोनू, रत्नाळी, लसून, अद्रक, सांबार, कोवडा व इतर सर्व पालेभाज्या,कापूस
13 बाजार व आर्थिक वर्ष 1 एप्रील ते 31 मार्च
14 विक्रीची पध्दत लीलावाद्वारे
15 बाजार फीचे दर 100/- रूपयास  1/- रू.
16 लेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था व सनदी लेखापाल
17 बाजार व्यवसायी
  अनुज्ञप्तीचा प्रकार अनुज्ञप्ती फी नुतनिकरण फी
    रूपयात रूपयात
1. अडते 100 90
2. व्यापारी अ,ब,क वर्ग 100,50,30 90,45,25
3. दलाल 100 90
4. प्रक्रीया अ,ब 100,50 90, 45
5. मापारी 10 09
6. वखार 15 14
7. मदतनिस 05 04
8. हमाल 05 03
18 मागील तिन वर्षातील व्यवसाय
वर्ष अडत्या व्यापारी
2014-15 945 2409
2015-16 961 2683
2016-17 920 2692
19 प्रक्रीया संस्था 178 अनुज्ञप्तीधारक
20 (अ) बाजार आवाराचे क्षेत्राबाबत
माहीती
1. धान्य बाजार 34.70 एकर
2. मिरची बाजार 17.77 एकर
3. गुरे व कळबी बाजार 20.97 एकर
4. संत्रा व फळे बाजार 16.38 एकर
5. आलु कांदा व भाजीबाजार 13.50 एकर
6. म.फु.भाजीबाजार 03.00 एकर
7. कापूस बाजार नागपूर 03.92 एकर
8. कापूस बाजार बुटीबोरी
(4+.5.35)
09.35 एकर
9. कळबि बाजार इतवारा 03.00 एकर
  (ब) समितीचे ताब्यातील
एकुन जागा
140 एकर
  (क) वखार व गोदामाचे क्षेत्रफळ
1. गोदाम (कळमना बाजार) क्षमता 1000 मे. टन
2. गोदाम (बुटीबोरी) क्षमता 1000 मे. टन
3. वखार (कळमना बाजार) क्षमता 3300 मे. टन
21 (अ) लीलाव दालनाबाबत माहीती
    संख्या क्षेत्रफळ  
1. धान्य बाजार 12 11616
चौ. मिटर
2. फळे बाजार 05 08744
चौ. मिटर
3. मिरची बाजार 04 05476
चौ. मिटर
4. भाजीबाजार 05 04112
चौ. मिटर
5. मिरची ओटे 02 02370 चौ. मिटर
  (ब)शॉप कम गोडाउन बाबत माहीती
     
1. धान्य बाजार 283
2. फळे बाजार 214
3. मिरची बाजार 209
4. आलु कांदा बाजार 082
5. न्यू धान्य बाजार 259
22 सुविधा
01. कीरकोळ व्यापा-याकरिता दुकाने 160 Nos.
02. गोदाम 1000 मे टन बाजार आवार नागपूर 1 No.
03. गोडाउन 1000 मे टन बाजार आवार बुटीबोरी 1 No.
04. वखार बाजार आवार नागपूर 3300 मेटन 1 no.
05. गुराकरिता पाण्याचे टाके 4 Nos.
06. दुधाळ जनावराकरिता शेड 3 Nos.
07. जल शुध्दीकरण केंद्र 1 दसलक्ष ली. 1 No.
08. ओव्हरहेड पाण्याची टाकी एकुण क्षमता 5 लक्ष ली. 2 Nos.
09. भुमिगत पाण्याची टाकी एकुण क्षमता 13 लक्ष ली. 2 Nos.
10. कुपनलीका 22 Nos.
11. धर्मकाटे 30 टणी 3 Nos.
12. प्रशासकीय भवन 1 No.
13. शेतकरी निवास 180 बेड 1 No.
14. पोलीस स्टेशन 1 No.
15. पोस्ट ऍन्ड तार कार्यालय 1 No.
16. शितगृहे 4 Nos.
17. विद्युत उपकेंद्र 750 केव्हीए 1 No.
18. विद्युत उपकेंद्र 500 केव्हीए 1 No.
19. डीजल जनरेटर 320 केव्हीए 1 No.
20. डीजल जनरेटर200 केव्हीए 1 No.
23 मागील तिन वर्षातील
उत्पन्न-खर्च
वर्ष उत्पन्न खर्च
2014-15 3918.00 2143.00
2015-16 4138.00 2095.00
2016-17 4235.00 2472.00
24 मागील तिन वर्षातील
उलाढाल
वर्ष     
2014-15 2509.00 करोड
2015-16 2536.00 करोड
2016-17 2389.00 करोड