सोयी-सुविधा |
|
संगणकीकरण:

|
कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर हयांनि संगणकीकरण सन एप्रील 2000 पासून सुरू केले. समितीने हया करिता समितीचे स्वत:चे अप्लीकेशन सॉफ्टवेअर, ओरॅकल डाटाबेस व डेव्हलपर मध्ये विकसीत केलेले आहे. समितीने अप्लीकेशन सॉफ्टवेअरचे काम तिन टप्यात पूर्ण केलेले आहे. समितीने प्रथम टप्यात प्रशासकीय भवनांत सेस वसूली, विद्युत बिलाची वसुली, पाणी बिलाची वसुली, कर्मचारी पगारपत्रक हयांचे काम पूर्ण केले. समितीने दुस-या व तिस-या टप्यात लेखा विभाग, अनुज्ञप्ती विभाग, गाळे विभाग, कोर्ट केसेस, ऍग्रीमेटंस, इन्व्हेटरी, डेडस्टाक, प्रापर्टी रजिस्टर, आवक-जावक गेटचे मॅनेजमेट चे माडुल तयार केले आणि समितीच्या आवारात असलेले तीन संगणकीकृत एव्हरी मेक 30 टणी धर्मकाटे वायरलेस द्वारा एकमेकांशि व मुख्य सर्वरशी जोडण्यात आलेले आहे. समितीने बाजार आवारात वायरलेस नेटवर्कीग, आप्टीक फायबर केबल नेटवर्कीग आणि कॅट 5 केबल नेटवर्कीचा उपयोग केलेला आहे. सद्या समितीने 6 लींक वायरलेसद्वारे जोडलेल्या आहेत आणि 7 लींक आप्टीक फायबर केबलद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत. तसेच संपूर्ण बाजार आवारातील समितीचे सर्व विभागाशी संपर्क करणेकरिता 40 लाईनचे स्वतंत्र पॅनासोनिक मेकचे इपीबिक्स लावलेले आहे त्यामुळे संपूर्ण विभाग टेलीफोन ईटरकामद्वारा जोडलेले आहेत.
|
वखार

|
समितीने शेतक-याच्या सोयीकरीता 3300 मेट्रीक टन क्षमतेचे वखार समितीचे आवारात बांधलेले आहे. आणि समितीने शेतमाल तारण योजना सुरू केलेली आहे. मालाचे किमतीच्या 75 टक्के एवढे कर्ज 6 टक्के व्याजाच्या दराने 180 दिवसाकरीता देण्यात येत आहे.
|
उपहारगृह
|
बाजार समितीचे शेतकरी भवनात नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीद्वारे पुरस्कृत व शताब्दी महीला बचतगटाद्वारे संचालीत फक्त चार रूपयांमध्ये शेतकरी बांधवाकरीता पोटभर जेवणाची सोय करण्यात आलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्याकरीता ऍक्वागार्ड बसविण्यात आलेले आहे व शेतकरी निवासात अल्पदरात शेतकरी बांधवाकरीता राहण्याची सोय उपलब्ध आहे.
|
दवाखाना
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवनात शेतकरी व इतर बांधवाकरीता मोफत आरोग्यसेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आलेले आहे त्यामध्ये मोफत वैद्यकीय सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे.
|
रुग्णवाहिका
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकरी बांधवाकरीता 24 तास रूग्णवाहीकेची सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागपूर शहरामध्ये रू 300/- आणि नागपूर शहराबाहेर प्रती किलोमीटर रू. 6/- दर निश्चित केलेले आहे.
संपर्काकरीता टेलीफोन नंबर्स 0712-2790800,2680280 आणि
मोबाईल नंबर 9096512948, 8600105707 आहेत.
|
माती परीक्षण केंद्र
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळेत शेतकरी बांधवांच्या शेतातील उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने माती तपासणी करून त्यावर मार्गदर्शन केले जाते. याकरीता प्रती सॅम्पल रू. 30/- आकारण्यात येतात त्याचप्रमाणे इंटरनेटद्वारे संपूर्ण कृषि उत्पादीत मालाचे बाजारभाव पाहण्याची सोय टीकर बोर्डावर उपलब्ध आहे.
|
कृषी संस्कृती केंद्र
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवनात कृषि संस्कृति केंद्राची स्थापना करण्यात आलेली आह.े त्याअंतर्गत कृषि वाचनालय/लायब्ररीची उभारण्यात आलेली आहे त्यामध्ये शेतकरी व इतर बांधवाकरीता आधुनिक तत्रज्ञानाच्या माहीतीकरीता अद्यावत पुस्तके, शेतकी मासीके आणि दैनिक वर्तमानपत्राची सोय आहे तसेच प्रोजेक्टरद्वारा शेतीपिकांची माहीती देण्याकरीता विविध सिडी उपलब्ध आहेत. शेतीविषयक माहीती तज्ञ मंडळीकडुन देण्यात येते.
|
कांदा चाळ
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे आलु-कांदा बाजारात प्रायोगीक तत्वावर कांदा साठवणुकीकरीता कांदा चाळ उभारण्यात आलेली आहे कांदा चाळीमुळे कांदयाची साठवणुक करून त्याचा शेतकरी बांधवांना फायदा होवू शकेल.
|
थंड पेय जल सुविधा
|
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मिरची, संत्रा, आलु-कांदा आणि भाजी बाजारातील ऑक्शन हॉल मध्ये वाटर कुलर ऍक्वागार्ड सह बसविण्यात आले असून 24 तास थंड व शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केलेली आहे.
|
01. |
कीरकोळ व्यापा-याकरिता दुकाने |
160 Nos. |
02. |
गोदाम 1000 मे टन बाजार आवार नागपूर |
1 No. |
03. |
गोडाउन 1000 मे टन बाजार आवार बुटीबोरी |
1 No. |
04. |
वखार बाजार आवार नागपूर 3300 मेटन |
1 no. |
05. |
गुराकरिता पाण्याचे टाके |
4 Nos. |
06. |
दुधाळ जनावराकरिता शेड |
3 Nos. |
07. |
जल शुध्दीकरण केंद्र 1 दसलक्ष ली. |
1 No. |
08. |
ओव्हरहेड पाण्याची टाकी 5 लक्ष ली. |
2 Nos. |
09. |
भुमिगत पाण्याची टाकी 13 लक्ष ली. |
2 Nos. |
10. |
कुपनलीका |
22 Nos. |
11. |
धर्मकाटे 30 टणी |
3 Nos. |
12. |
प्रशासकीय भवन |
1 No. |
13. |
शेतकरी निवास 180 बेड |
1 No. |
14. |
पोलीस स्टेशन |
1 No. |
15. |
पोस्ट ऍन्ड तार कार्यालय |
1 No. |
16. |
शितगृहे |
4 Nos. |
17. |
विद्युत उपकेंद्र 750 केव्हीए |
1 No. |
18. |
विद्युत उपकेंद्र 500 केव्हीए |
1 No. |
19. |
डीजल जनरेटर 320 केव्हीए |
1 No. |
20. |
डीजल जनरेटर200 केव्हीए |
1 No. |
|
|
|