माती परीक्षण केंद्र
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने, इंडीयन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप. ली.(इफ्को) नवी दिल्ली हयांच्या सहकार्याने माती परीक्षण केंद्राची स्थापना सन 2004 साली केलेली आहे. यासाठी मातीपरिक्षण केद्राची भव्य इमारत उभारण्यात आली असून संपूर्ण प्रयोगशाळेचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. या केद्राचा उद्येश शेतक-यांचे शेतातील माती 'ना नफा ना तोटा' हया तत्वावर तपासली जाणार असून त्यांच्या जमिनीचा पोत सुधारून लागवड खर्चात बचत करणे व त्यांचे उत्पन्न वाढावे हा आहे.
शेतक-यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा याबद्यल समितीने माहीतीपत्रक तयार केलेले आहे आणि ते मातीपरिक्षण केद्रामध्ये व समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
भविष्यामध्ये हे केंद्र शेतक-यांना सर्व प्रकारची माहीती जसे खते, बि-बियाणे, किटकनाशके व सुधारीत तंत्रज्ञान इत्यादी देणार असून शेतकरी माहीती केंद्र म्हणून काम करणार आहे. हे केंद्र पूर्णत:हा शेतक-यांच्या सेवेसाठी काम करणार आहे.
सर्व शेतकरी बांधवाना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या शेतातील माती तपासून पिकंाना खताच्या योग्य मात्रा वापराव्यात व आपले उत्पन्न वाढवावे.
माती परीक्षण केद्राचा पता : माती परीक्षण केद्र, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर-35,
दुरघ्वनी क्र. 0712-2680280,2680877
विस्तारीत क्रमांक. 119
सॅम्पल तपासणी फी : प्रती सॅम्पल रू 30/- |