|
जलशुद्धिकरण केंद्र |
|
 |
|
पुरवठा आवशकतेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यामुळे स्वत:ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचे सल्यानी तयार केली. पाणी पुरवठा योजने अंतर्गत कन्हान नदीत इंटेक वेल आणि किना-यावर जॅक वेल व हेडवक्र्स बांधून 17 की.मी. लांबीची एम.एस. पाईप लाईन टाकून पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डवर पाणी आणलेले आहे. यार्डवर 1 दश लक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जल शुध्दीकरण केंद्र उभारण्यात आलेले असून शुध्द झालेले पाणी 6.50 लक्ष लीटर क्षमतेच्या दोन भुमिगत टाक्यामध्ये साठवून 2.50 लक्ष लीटर क्षमतेच्या दोन ओव्हर हेड वॉटर टॅक द्वारे पाण्याचे यार्डवर वितरण करण्यात येते. समितीने स्वतंत्र पाणी पूरवठा योजना राबविल्यामुळे महानगर पालीकेवर अवलंबून न राहता समितीकडे मुबलक पाणी उपलब्ध झालेले आहे. |
|
|
|